आम्हाला पुणे का आवडते..?

आम्हाला पुणे का आवडते..? आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही व

गेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही ! उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे , किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे, पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .;), गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर ..;) , सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या ‘सिंव्हा’ सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या ‘सर्व’ पराक्रमांचे पुणे , लाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे, शनिवार वाड्यात ‘सांडलेल्या’ रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे, ‘ध’ चा ‘मा’ केलेल्यांचे पुणे , ‘न’ ला ‘न’च आणि ‘ण’ ला ‘ण’च म्हणणारे पुणे , इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे , ‘कोटी’सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे, SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे , आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे , Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे, वैशाली च्या yummy सांभार चे पुणे, रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे , पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे, Nike आणि Reebok वाले पण पुणे , खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे, आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे, सोडा शॉप चे पण पुणे, अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणार्यांचे’ पुणे , कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) , नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे, बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे , Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या ‘नळी’ वाले पुणे, सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे, मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा ‘आव्वाज’ जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय – अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे, ‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि… देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे, तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे, स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे, सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा “बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान ” अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , ‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे !, ०२० चे आणि MH “बारा” चे पुणे, आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे, सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D ‘souza ,D ‘casta चे पण पुणे, पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या ” फुलराणी ‘ चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या “त्या फुलराणी’ चे पुणे, ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे, भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे, पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या ‘NFAI ‘ चे पुणे , काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक “सवाई” चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे, नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे , पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे , फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे, आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे, जगातल्या सगळ्यात “प्रेमळ” आणि “स्वस्त” रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे, प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता म टा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे, Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे, सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे… पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि “आम्हाला कशाला लागतोय mobile ?” असे पण म्हणणारे पुणे, अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे, सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे, उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे, Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !! आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?
(A repost found on the Web)
Advertisements

As the rightist Leader Age’s gracefully

Ive always been confused between choosing a forum,Group-political,nonpolitical.. Little orators & real do’ers exist around us with rock solid agendas & a equally strong will to enable a better livelihood for us all around & stand true to their promises.

Amidst the dilemma of choosing to stand by a political party,has bee shivsena,for the many reason ive heard & seen them at work with the able Guidance of the founder Shri Balasaheb Thakrey. As has been a yearly routine with Shivsena,Dasera melava(the Annual gathering of Shivsena) stood the test of lacs of ppl occupying Shivaji park for the last 46 odd years only to hear Bal Thakrey guide them.

This year however was distinguished with the non-presence of Bal thakrey,the video message broadcasted during the meeting though. The leader is always looked 4wd to owing to his Straight forwardness,pro-Marathi-Hinduism in true sense. The Video showed the 86year old Man speaking his heart out about the regret of not being in the pink of health 7 hence inability to attend the meet.his views of the ongoing Scam-Streams & what of what. All convincing in sharp hardhitting words as always.

The once (& even now) Charismatic Leader-Orator talked way to above par for his Age,yet leaving his lakhs of followers in the moment of sadness as he described his falling health & in a way bid a Good bye to his  fans calling for support & loyalty from the people around for the work done.Way to emotional & touching for much of the Rightists for the support to enable the religion thrive amidst the Votebankers during the bad times created by anti-socialists & many more reasons. No (no cases filed,no allegations, existing) involvement in Scams being a prominent one therein.
Image

ғor тнe иєω υnĸnown

Well,If the Question is “What Motorcycling means to me”

The answer to this Question would be a question for your Consideration,here is how it Goes,

What do you do when you are Bored,have lots of  Leisure time in tow,or want to celebrate some event [eg. exams completion], feeling real low,or want to arrange a meetup of friends or Just a evening when the Couch & its mate TV seem to bore you??

I make a few calls,text,get like-minded buddies along n off we go on a long ride on my bike-The ZMR  [read Ride not drive]

^this solely should put in perspective “What motorcycling means to me”,but that’s not all,Allow Me..

Going Places

The first time we ventures out on bike was to Raigad,n that was not out of option but out of compulsion.the saga of student life,always short of Vitamin M,parental NOC,etc etc.Hence the low cost per km with passion & CD Dawn it was what was opted for.n it proved to be a deciding ride[just like a perspective for Biking Pre raigad ride & the other post ride][around 250km return]All of us loved the ride though was energy-wise  bit taxing.We vowed that for the next new years it would be Premium bikes & a better far off Destination, Zma & t’bird it was for tarkarli.& again this was a Awesome experience.Since then theres no looking in the rearview mirror 😉

Pune has been a catalyst in boosting our riding ventures, it surrounding have amazed us for years & yet they continue to do so..

Go lonavala’wards [n number of times ] & tell me if it was a boring ride,

Get offroading to Rajmachi,

Set towards Amby valley route,

visit the tiger valley on a night ride,

then The Varandha Ghat patch,The satara’wards NH4. or the ride to lavasa n much more.

Comfort quotient vs. Trill of unbound[4 wheels vs 2wheels]←

We Did Tarkarli[450 odd km] on Bikes n then we did Goa[500 odd km ] in a Car,each of the genre has its fan following.For me the Bike ride leverages the fun of getting to the destination.

Firstly: Its the Gush of Air that sinks into the Cranium n provokes the “adrenalin producing glands” w/o any foriegn intoxication {Exaggeration you think it is?huh? Well,it really is not.n if you thought otherwise ur not one amoung the breed}

And:  Each man is inherently different,but then much like-minded folks make Bikers,On a monsoon outing,one of us may be stuck at the sight of any of the Natures wonders;howsoever petty be it,that others may not generally take a note of,  when riding you just get off tarmac,park your bike,click the shots you desired n again race off to cope up with others,when in Car,the comfort kicks in the sluggishness,it really does,n then there is the jargon ‘Group consensus’ to be dealt with..

And also: there have been sane people doing rounds of the earth,yes Earth I said soaking into the pleasures of varied n anonymous cultures,strange people n the sightseeing along the journey? If you’d declared them Insane/jobless people You’d like to check out these links www.longwayround.com; www.2ridetheworld.com Charley thruman;Evan mcgregor [Both Hollywood actors]wont be by any chance be classified as insane.

Only a biker knows why a dog sticks his head out the car windows ”

This slideshow requires JavaScript.

For me,I just opted for it [Biking] by mere chance & have fallen for it.I ride to get the taste of the Cutting at a faroff anonymous tapri,for knowing where the unknown roads lead to,for Getting to know the unknown that is new each single time.

This post is a “The Castrol Power1 Blogging Contest” entry on Indiblogger.in

Bike  powered by Castrol Power1 racing engine oil;

Post powered by Castrol page at www.facebook.com/CastrolBiking

n yes, “Whatever it is, it’s better in the wind”